INDvsSA: आफ्रिकेला बुमराहने दिले झटके, मॅच रोमांचक स्थितीत
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
सेंच्युरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने केलेल्या १५३ रन्सच्या खेळीमुळे भारताला मोठा स्कोअर करण्यास मदत झाली. विराटने खेळलेल्या या इनिंगमध्ये १५ फोरचा समावेश होता. विराटचं टेस्ट क्रिकेटमधलं हे २१वी सेंच्युरी आहे.
विराटने केलेल्या शानदार सेंच्युरीमुळे टीम इंडियाने ३०७ रन्स केले होते. तर, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या इनिंगमध्ये ३३५ रन्स केले होते. त्यामुळे टीम इंडिया २८ रन्सने पिछाडीवरच होती.
यानंतर मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमला सुरुवातीलाच दोन झटके बसले. स्कोअर बोर्डवर फक्त १ रन असताना मारक्रम तर स्कोअर ३ रन्स असताना हाशीम आमला आऊट झाला. यानंतर आता एबी डिव्हिलियर्स आणि डिन एल्गार यांनी दक्षिण आफ्रिकेची इनिंग सावरायला सुरुवात केली.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ९० रन्सवर २ विकेट्स आहे. म्हणजेच आफ्रिकेने ११८ रन्सची आघाडी घेतली आहे.
दरम्यान, मॅच सुरु असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे काही वेळासाठी खेळ थांबवला. नंतर मॅच पुन्हा एकदा सुरु करण्यात आली, मात्र अंधुक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला.