INDvsSA: ज्या खेळाडूला टीममधून केलं होतं बाहेर तोच बनला मॅचचा हिरो
दक्षिण आफ्रिकेविरोधात ३ टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये भलेही टीम इंडियाचा २-१ ने पराभव झाला असेल. पण, तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने आपला दमदार प्रदर्शन दाखवलं आहे.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरोधात ३ टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये भलेही टीम इंडियाचा २-१ ने पराभव झाला असेल. पण, तिसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने आपला दमदार प्रदर्शन दाखवलं आहे.
तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सने दाखवलेलं प्रदर्शनामुळे विजय मिळवण्यात खूपच मदत झाली.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी एका-एका इनिंगमध्ये ५-५ विकेट्स घेतले. मात्र, एक प्लेअर असा आहे ज्याच्यामुळे खूपच फरक पडला. हा प्लेअर म्हणजे भुवनेश्वर कुमार.
भुवनेश्वर कुमारला दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीममधून बाहेर करण्यात आलं होतं. मात्र, तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये त्याने दाखवलेल्या प्रदर्शनामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
पहिल्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन दाखवल्यानंतरही भुवनेश्वरला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी दिली नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरणं होतं. पहिल्या टेस्टमध्ये भुवनेश्वरने पहिल्या इनिंगमध्ये ४ विकेट्स घेतले होते. तसेच हार्दिक पांड्यासोबत मिळून ९९ रन्सची पार्टनरशीपही केली होती. तर दुसऱ्या इनिंगमध्येही २ विकेट्स घेतले होते.
दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला संधी न दिल्याने सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली. तिसऱ्या टेस्टमध्ये भुवनेश्वर कुमारने एकुण ४ विकेट्स घेतले.
तिसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने ४९ बॉल्समध्ये ३० रन्स केले तर दुसऱ्या इनिंगमध्ये ७६ बॉल्समध्ये ३३ रन्सची इनिंग खेळली. म्हणजेच दोन्ही इनिंग मिळून भुवनेश्वरने ६३ रन्स केले आणि टीम इंडियानेही ६३ रन्सने विजय मिळवला.