नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात टीम इंडियाने पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये आफ्रिकेच्या बॅट्समनला चांगलाच दणका दिला आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने आफ्रिकन टीमला २८६ रन्सवर ऑल आऊट केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या टीमला गारद करण्यात मोठी कामगिरी केली ती म्हणजे टीम इंडियाच्या भुवनेश्वर कुमार याने. भुवनेश्वर कुमारने पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतले.


पहिल्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने खातंही उघडलं नव्हतं तेव्हा भुवनेश्वर कुमारने पहिला झटका दिला. डीन एल्गरला खातंही न उघडता माघारी धाडलं. एल्गरच्या नावावर रोहित शर्मासोबत टी-२०मध्ये सर्वाधिक सेंच्युरी बनवण्याचा रेकॉर्ड आहे.


पहिल्या झटक्यातून आफ्रिकन टीम सावरत असतानाच लगेच दुसरा विकेट घेत भुवनेश्वरने आणखीन एक झटका दिला. त्यावेळी आफ्रिकन टीमने ७ रन्स केले होते.


त्यानंतर टीमच्या पाचव्या ओव्हरमध्ये हाशिम आमलाला भुवनेश्वर कुमारने माघारी धाडलं. ४.५ ओव्हर्समध्येच दक्षिण आफ्रिकेचे अवघ्या १२ रन्सवर तीन विकेट्स होते. गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच आफ्रिकन टीमने पहिल्या टेस्ट मॅचमध्ये २९ बॉल्समध्ये ३ विकेट्स गमावले आहेत.


परदेशातील ही चौथी घटना आहे ज्यावेळी टीम इंडियाने एकही रन न देता विरोधी टीमची पहिली विकेट घेतली. यापूर्वी टीम इंडियाने असा कारनामा तीनवेळा केला आहे. 


  • दक्षिण आफ्रिकेत १९९२-९३ मध्ये


  • श्रीलंकेत १९९३ मध्ये


  • इंग्लंडमध्ये २००२ मध्ये


  • आणि आता पुन्हा दक्षिण आफ्रिकेत २०१८ मध्ये टीम इंडियाने हा कारनामा केला आहे.



दक्षिण आफ्रिकेचा सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सर्वात कमी स्कोअर


टेस्टमध्ये पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक वेगाने ३ विकेट्स गमावत आफ्रिकेच्या टीमचा हा तिसरा खराब प्रदर्शन राहीलं आहे. यापूर्वी १९९२मध्ये भारताविरोधात ११ रन्सवर आफ्रिकेने तीन विकेट्स गमावले होते.


  • १८८९ मध्ये इंग्लंडविरोधात १० रन्सवर ३ विकेट्स गमावले


  • १९९२ मध्ये भारताविरोधात ११ रन्सवर ३ विकेट्स गमावले


  • १९९७ मध्ये पाकिस्तानविरोधात १२ रन्सवर ३ विकेट्स गमावले


  • २०१८मध्ये भारताविरोधात १२ रन्सवर ३ विकेट्स गमावले