केपटाऊन : हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात ९३ रन्सची धडाकेबाज इनिंग खेळली. मात्र, पांड्याला एका भारतीय बॅट्समनचा २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या इनिंगमध्ये हार्दिकने भुवनेश्वर कुमारसोबत आठव्या विकेटसाठी ९९ रन्सची पार्टनरशीपही केली. पांड्याने खेळेलेल्या या इनिंगमुळे टीम इंडियावरचं मोठं संकट टळलं.


केपटाऊनमध्ये टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी सर्व दिग्गज बॅट्समन पेवेलियनमध्ये परतत होते. त्याचवेळी हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी टीमला सावरलं. 


हार्दिक पांड्याने ९३ रन्सची शानदार इनिंग खेळली. यामध्ये त्याने १४ फोर आणि एक सिक्सरही लगावला.



हार्दिक पांड्याची खेळी पाहून असं वाटत नव्हतं की तो दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेत हार्दिकने केवळ हाफ सेंच्युरी केली नाही तर २५ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता.



२५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९२ साली भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती. त्यावेळी प्रवीण आमरे यांनी डरबन टेस्टमध्ये सेंच्युरी केली होती. दक्षिण आफ्रिकेत आमरे यांनी आपल्या करिअरची पहिली टेस्ट मॅच खेळली आणि १०३ रन्स केले होते. 


हार्दिक पांड्या आपली चौथी टेस्ट मॅच खेळत होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात ही हार्दिक पांड्याची पहिलीच टेस्ट मॅच होती. त्याने ९३ रन्सची इनिंग खेळली. हार्दिकला प्रवीण आमरे यांचा रेकॉर्ड तोडण्यास केवळ ११ रन्स कमी पडले.