नवी दिल्ली : भारताचा माजी कॅप्टन कपिल देव यांनी  बुधवारी टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा ऑलराऊंडर म्हटलं जातं आणि त्याची तुलना कपिल देव यांच्यासोबत अनेकदा करण्यात येते. कपिल यांच्यानंतर भारताचा सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर म्हणून हार्दिक असल्याचं बोललं जातं. 


मात्र, हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट मॅचमध्ये केलेल्या खराब प्रदर्शनामुळे कपिल देव चांगलेच नाराज झाले आहेत.


कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "जर हार्दिक पांड्या अशाच प्रकारे चुका करत राहीला तर माझ्यासोबत त्याची तुलना होऊ शकत नाही."


दुसऱ्या टेस्टमध्ये हार्दिकने केली निराशा


दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये हार्दिक पांड्याने दोन्ही इनिंग्समध्ये निराशाच केली. फास्ट बॉलर लुंगी एनगिडी याने टाकलेला बॉल बाहेर जात असताना हार्दिकने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कॅच आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये पांड्या रन आऊट झाला कारण त्याने आपली बॅट क्रिजवर ठेवली नव्हती. पांड्याच्या या निष्काळजीपणावर विश्लेषकांनीही टीका केली होती. संदिप पाटील यांनी म्हटलं की, दोघांती तुलना करणं योग्य नाहीये कारण, पांड्याने आता कुठे आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली आहे.


मी कपिल देव याच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. कपिलने चांगलं प्रदर्शन करत १५ वर्ष भारतासाठी खेळला आणि पांड्या आता कुठे आपली पाचवी टेस्ट मॅच खेळत आहे. अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे असंही संदिप पाटील यांनी म्हटलं.


पहिल्या टेस्टमध्ये ९३ रन्सची इनिंग


हार्दिक पांड्याने केवळ पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्याने ९३ रन्सची इनिंग खेळली होती. यानंतर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पांड्या पूर्णपणे अपयशी ठरला.