केपटाऊन : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने कमबॅक केल्याचं दिसत आहे. दुसऱ्या दिवशी आफ्रिकन टीमच्या बॉलर्सने टीम इंडियाच्या बॅट्समनला एकामागोमाग माघारी धाडलं आणि मॅचमध्ये पुनरागमन केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलर्सने केलेल्या चांगल्या बॉलिंगमुळे दक्षिण आफ्रिकन टीम २८६ रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाला सुरुवातीलाच झटके बसले आणि पहिल्या दिवस अखेर टीम इंडियाने ३ विकेट्स गमावत केवळ २८ रन्स केले. 


त्यानंतर दुसऱ्या दिवशीही टीम इंडिच्या बॅट्समनने निराशा केली. हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पांड्याने भुवनेश्वर कुमारसोबत चांगली पार्टनरशीप केली. मात्र, हार्दिकला सेंच्युरी करण्यात अपयश आलं.


हार्दिक पांड्याने १४ फोर आणि एक सिक्सर लगावत ९३ रन्सची इनिंग खेळली. हार्दिक पांड्याने केलेल्या या फटकेबाजीमुळे टीम इंडिया २०९ रन्सवर ऑल आऊट झाली. यामुळे दक्षिण आफ्रिकेने ७७ रन्सची आघाडी घेतली आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या फिलँडर आणि रबाडा या दोघांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर, मॉर्कल आणि डेल स्टेन या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले.