नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकन दौऱ्यावर आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सौरव गांगुलीने कॅप्टन विराट कोहलीवर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिल्या टेस्ट मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हन संदर्भात खूप मोठा वाद उभा राहीला आहे. गांगुलीने म्हटलं की, सध्याचा फॉर्म पाहून प्लेइंग इलेवन निवडण्यात काहीही गैर नाहीये. मात्र, कॅप्टन विराटने केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडे दुर्लक्ष करायला नको. याच दोघांनी परदेशातील पिचवर चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे.


सौरव गांगुली हा शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवल्याने आनंदी नाहीये. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी धवन आणि रोहितने श्रीलंकेविरोधात ३ टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये आपलं चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं. धवनने ४८ च्या अॅव्हरेजने १९२ रन्स केले होते. तर, दोन टेस्ट मॅच खेळणाऱ्या रोहित शर्माने एक सेंच्युरी आणि दोन हाफसेंच्युरी केल्या होत्या. भारताने ही सीरिज १-०ने जिंकली होती.


यापूर्वी धवनने श्रीलंकेत खेळलेल्या सीरिजमध्ये दोन सेंच्युरीसोबतच ३५८ रन्स बनवले होते. या दरम्यान २०१७ मध्ये रहाणे खराब फॉर्ममध्ये होता आणि त्याने चांगले रन्स केले नाही. केपटाऊनमध्ये भारताला विजयासाठी २०८ रन्सची आवश्यकता होती. या मॅचमध्ये धवनने दोन इनिंग्समध्ये १६ रन्स केले तर रोहितने पहिल्या इनिंगमध्ये ११ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १० रन्स केले.


धवन आणि रोहित यांचा परफॉर्मन्स पाहून गांगुलीने म्हटले की, परदेशातील पिचवर रोहित आणि धवन यांचं प्रदर्शन चांगलं तर राहीलं नाहीच तर खूपच खराब राहीलं. कोहली कदाचित या दोघांना दुसऱ्या टेस्टमध्येही खेळवेल कारण तो त्याचा दोघांवरही विश्वास आहे असंही गांगुलीला वाटतं.


केएल राहुल, रहाणे यांचा परफॉर्मन्स परदेशात चांगला असतानाही विराटने त्यांना डावललं आणि धवन, रोहित यांना निवडलं. यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


दुसरी टेस्ट मॅच १३ जानेवारीपासून सेंच्युरियनमध्ये सुरु होत आहे. तर, तिसरी टेस्ट जोहान्सबर्गमध्ये खेळली जाणार आहे. 


रहाणेने न्युझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्टइंडिजमध्ये सेंच्युरी लगावली होती. केवळ दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशमध्ये काही रन्ससाठी त्याची सेंच्युरी हुकली होती. तर, केएल राहुलनेही विदेशातील पिचवर तीन सेंच्युरी लगावल्या आहेत.