जोहान्सबर्ग : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेली तिसरी टेस्ट मॅच भारताने जिंकली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर ६३ रन्सने विजय मिळवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेची टीम १७७ रन्सवर गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आलं आहे. त्यामुळे टीम इंडियाने ही मॅच ६३ रन्सने जिंकली. मात्र, दक्षिण आफ्रिकेने ही सीरिज २-१ने आपल्या खिशात घातली आहे.


मॅचच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या टीमने विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. टीम इंडियाला केवळ एकच विकेट घेण्यात यश आलं होतं. त्यानंतर मैदानात आलेल्या डीन एल्गर आणि आमला यांनी चांगला जम बसवत मॅचवर आपली पकड निर्माण केली होती.


आफ्रिकेच्या एल्गर आणि आमला यांची जोडी फोडण्यात टीम इंडियाला यश आलं. आमलाला इशांत शर्मा याने आऊट केलं. तर, एल्गरने आपली एकाकी झुंज सुरुच ठेवली होती. 


एल्गरने एकाकी झुंज सुरुच ठेवली असताना दुसरीकडे टीम इंडियाच्या बॉलर्सने आफ्रिकेच्या एक-एक बॅट्समनला माघारी धाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे एल्गरची एकाकी झुंज अपयशी ठरली आणि टीम इंडियाने आफ्रिकेवर विजय मिळवला.


टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच ५ विकेट्स घेतले. बुमराह आणि इशांत शर्माने प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले.