INDvsSA: `या` खेळाडूने दिला टीम इंडियाला जिंकण्याचा मंत्र
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताची टॉप ऑर्डर ढासळली. केवळ कॅप्टन विराट कोहलीने चांगली बॅटिंग केली.
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारताची टॉप ऑर्डर ढासळली. केवळ कॅप्टन विराट कोहलीने चांगली बॅटिंग केली.
विराट कोहलीने सकारत्मक अंदाजात बॅटिंग सुरु ठेवली. मात्र, इतर बॅट्समनने क्रीडाप्रेमींची निराशा केली. शिखर धवनच्या जागेवर टीममध्ये खेळत असलेला लोकेश राहुलही फ्लॉप ठरला.
टीम इंडियाला पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता दुसरी टेस्ट मॅच जिंकायची असेल तर टीम इंडियाला चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे.
अनुभवी बॅट्समन वसीम जाफर याच्या मते, टीम इंडियाला मॅचमध्ये पुनरागमन करण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये ५०० हून अधिक स्कोअर करावा लागेल.
विदर्भाच्या टीमला पहिल्यांदाच विजेता बनविण्यात मदत करणाऱ्या जाफरने म्हटलं की, "आपण आफ्रिकन टीमला ऑल आऊट केलं आता आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जर पहिल्या इनिंगमध्ये ५०० रन्सचा टप्पा ओलांडला तर आपण ही मॅच नक्कीच जिंकू".
जाफरने पुढे म्हटलं की, "सध्याच्या टीममधील बहुतेक बॅट्समन हे दक्षिण आफ्रिकेत यापूर्वीपासूनच खेळले आहेत. तसेच ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या देशांमध्येही खेळले आहेत त्यामुळे कसं खेळावं हे त्यांना चांगलचं माहिती आहे. त्यांनी पिचवर अधिक वेळ टिकावं लागणार आहे."
टीम इंडियाच्या निवडीवर भाष्य करताना जाफरने कॅप्टन विराट कोहलीची बाजु घेतल्याचं दिसलं. "विराटला माहिती आहे की त्याने कुठला निर्णय घेतला आहे. आपल्याला त्याचा सन्मान करायला हवा. यावर विराट नक्कीच बोलेल मात्र, त्यासाठी सीरिज संपण्याची वाट पहावी लागेल".