नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंकन टीम यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये टीम इंडियाने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २६० रन्स केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये कॅप्टन रोहित शर्माने खेळलेल्या झंझावती इनिंगच्या जोरावर टीम इंडियाला इतका मोठा स्कोर उभा करण्यात मदत झाली. 


रोहित शर्माने अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली आहे. इंदूरमधील होळकर स्टेडिअममध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात खेळताना ११ फोर आणि ८ सिक्सर लगावत सेंच्युरी केली. रोहितने अँजिलो मॅथ्युज याच्या बॉलवर फोर लगावत डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.


दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये रोहित शर्माने ४६ बॉल्समध्ये ११८ रन्स केले आहेत. यावेळी त्याने १२ फोर आणि १० सिक्सर लगावले आहेत.


टीम इंडियाकडून रोहित शर्माने ४३ बॉल्समध्ये ११८ रन्स केले ज्यामध्ये १२ फोर आणि १० सिक्सरचा समावेश आहे. केएल राहुलने ४९ बॉल्समध्ये ८९ रन्स केले. धोनीने २८ रन्स तर हार्दिक पांड्याने १० रन्स केले.