नागपूर : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे.


एका इनिंगने विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने श्रीलंकन टीमवर एक इनिंग आणि २३९ रन्सने विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजमधअये १-० ने आघाडी घेतली आहे. 


श्रीलंकन टीमला दिला झटका


श्रीलंकन क्रिकेट टीमने एक विकेट गमावत २१ रन्स केले होते. त्यानंतर आज मॅचच्या चौथ्या दिवशी खेळाला सुरुवात केली. सुरुवातीलाच रवींद्र जाडेजाने करुनारत्नेला आऊट करुन लंकेला झटका दिला. त्यानंतर भारतीय बॉलर्सने एकामागेएक विकेट्स घेण्यास सुरुवात केली.


टीम इंडियाची जबरदस्त बॉलिंग


टीम इंडियाकडून आर अश्विनने चार विकेट्स घेतले. रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मानं आणि उमेश यादव या तिघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले.



आर अश्विनचे ३०० विकेट्स


रविचंद्रन अश्विनने आपल्या टेस्ट करिअरमध्ये ३०० विकेट्स घेतले आहेत. त्यासोबतच सर्वात जलद विकेट्स घेण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे. 


टीम इंडियाने उभारला होता रन्सचा डोंगर


श्रीलंकन टीमने पहिल्या इनिंगमध्ये २०५ रन्स केले होते. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये सहा विकेट्स गमावत ६१० रन्स करत आपली इनिंग घोषित केली. टीम इंडियाच्या चार बॅट्समनने मॅचमध्ये सेंच्युरी लगावली. यामध्ये विराट कोहलीने डबल सेंच्युरी केली.