कोलकाता : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिली टेस्ट मॅच कोलकातामधील इडन गार्डन्सवर होत आहे. ठरलेल्या वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता मॅच सुरु होणार होती. मात्र, मॅचमध्ये एक अडथळा निर्माण झाल्याने अद्याप मॅच सुरु झालेली नाहीये.


बुधवारी कोलकातामध्ये पाऊस पडला. पाऊस पडल्याने मैदानात टीम्सला प्रॅक्टीसही करता आली नाही. मैदानातील पीच प्लास्टिकने कव्हर करण्यात आलं आहे. तसेच अद्यापही वातावरण खेळण्यासारखे नसल्याने अद्याप टॉस उडवण्यात आलेला नाहीये.


मॅच नेमकी किती वाजता सुरु होणार यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये. मात्र, मॅच थोड्याच वेळात सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या सीरिजमध्ये श्रीलंकन टीमलाही पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे टीम इंडिया मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. तर, आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी श्रीलंकन टीम मैदानात उतरणार आहे. 


विराट कोहली मोडणार गांगुलीचा रेकॉर्ड?


श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने ३-०ने विजय मिळवल्यास गांगुलीचा रेकॉर्ड विराट मोडणार आहे. ही सीरिज ३-०ने जिंकल्यास विराट कोहली सर्वाधिक टेस्ट जिंकणारा दुसरा भारतीय कॅप्टन बनणार आहे.