VIDEO: कोहली-पुजाराने एकाच बॉलमध्ये धावून काढले ४ रन्स
नागपूर टेस्टमध्ये एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला
नवी दिल्ली : नागपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या बॅट्समनने धडाकेबाज बॅटिंग केली. या मॅचमध्ये विराट कोहलीने रेकॉर्ड करत इतिहास घडवला. त्यासोबतच आणखीन एक वेगळाच प्रकार या मॅचमध्ये पहायला मिळाला.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई
मॅचच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समनने श्रीलंकन बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे टीम इंडियाने ४०५ रन्सची आघाडी घेतली. रविवारच्या दिवसअखेरीस श्रीलंकन टीमने १ विकेट गमावत २१ रन्स केले.
श्रीलंकन टीमचा पहिला विकेट
टीम इंडियाकडून इशांत शर्माने श्रीलंकन टीमचा पहिला विकेट घेतला. इशांत शर्माने सादिरा समाराविक्रमा याला शून्यावर आऊट करत माघारी धाडले.
नागपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे ओपनर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या दोन सत्रात विकेट टिकवून खेळ खेळला. त्यामुळे श्रीलंकन टीमच्या बॉलर्सला चांगलाच घाम फुटला.
एका बॉलमध्ये धावून चार रन्स काढले
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी एक वेगळाच नजारा पहायला मिळाला. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी एका बॉलमध्ये धावून चार रन्स काढल्याचं पहायला मिळालं.
अशा प्रकारे मैदानात एकाच वेळी चार रन्स धावून फारच कमी प्लेअर्स काढतात. त्यामुळे हा नजारा खूपच रोमांचक होता.