FIFA World Cup 2022: अर्जेंटिनासाठी वाईट बातमी, मेस्सीचे दोन स्टार खेळाडू फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर!
Correa and Gonzalez Argentina FIFA 22: अर्जेंटिनाचा पहिला सामना साऊदी अरेबिया विरोधात खेळला जाणार आहे. त्याआधी अर्जेंटिनाला दोन झटके बसल्याचं पहायला मिळतंय.
FIFA World Cup Qatar 2022: सर्वांची प्रतिक्षा असलेला फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2022) येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. फिफा वर्ल्डकप यंदा कतारमध्ये (fifa 22 in Qatar) खेळवला जात असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. 32 टीमचे थरारक सामने पहायला मिळणार असल्याने सर्वच संघ मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. अशातच आता वर्ल्ड कप विजेत्या अर्जेंटिनाला (Argentina) मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय. (Correa and Gonzalez out of Argentina FIFA World Cup 2022 squad)
कतार आणि इक्वेडोर (Qatar vs Ecuador) यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता सामन्याना खेळला जाईल. सी गटात असलेल्या अर्जेंटिनाचा पहिला सामना साऊदी अरेबिया विरोधात खेळला जाणार आहे. त्याआधी अर्जेंटिनाला दोन झटके बसल्याचं पहायला मिळतंय.
अर्जेंटिनाचे स्टार फुटबॉलपटू निकोलस गोंजालेज (Nicolas Gonzalez) आणि जोआकिन कोरिया (Joaquin Correa) हे दुखापतीमुळे फिफा विश्वचषक 2022 मधून बाहेर पडले आहेत. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (AFA) ही माहिती दिली आहे. निकोलस गोंजालेजच्या जागी एंजल कोरियाला (Angel Correa) संधी देण्यात आली आहे. तर जोआकिन कोरियाच्या जागी तियागो अल्माडा (Thiago Almada) याला संघात स्थान देण्यात येईल.
आणखी वाचा - फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या FIFA World Cup चे संपूर्ण वेळापत्रक
दरम्यान, उरुग्वे दक्षिण कोरियाविरुद्ध येत्या 24 नोव्हेंबरला फिफा विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल आणि एच ग्रुपमधील पोर्तुगाल आणि घाना यांच्याशीही संघर्ष होणार आहे. तर 24 नोव्हेंबरला ब्राझील सर्बियाविरुद्ध स्पर्धेला (Argentina vs Saudi Arabia) सुरुवात करेल. 2018 साली झालेल्या फिफा वर्ल्ड कपच्या (Defending Champion) फायनलमध्ये फ्रान्सने 4-2 ने दणदणीत विजय मिळवला होता.