नवी दिल्ली : भारताची स्टार जिमनास्ट दीपा करमाकरने गुडघ्याच्या दुखापतीमुळे फायनलमधून माघार घेतली आहे. आशियाई स्पर्धेच्या आर्टिस्टिक टीम स्पर्धेच्या फायनलमध्ये ती भाग नाही घेणार आहे. दीपाचे कोच बिश्वेश्वर नंदी यांनी म्हटलं की, 'गंभीर दुखापतीमुळे ती नाही खेळू शकतं. टीम स्पर्धेत तिला आराम दिला जाणार आहे पण (बॅलेसिंग) बीम फायनलमध्ये ती चांगली कामगिरी करेल. नंदी यांनी म्हटलं की, बॅलेंसिंग बीममध्ये 'लँडिंग' करणं अवघड नसतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपाला सरावा दरम्यान दुखापत झाली. दुखापतीमुळे ती अनेक दिवसांपासून दुखापतीचा सामना करत आहे. यामुळेच आस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या 21व्या कॉमनवेल्थमध्ये देखील ती भाग घेऊ शकली नव्हती.


दीपाला पोडियम सरावादरम्यान दुखापत झाली. ज्यामुळे तिने आर्टिस्टिक टीम स्पर्धेच्या फायनलमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण ती बीम स्पर्धेच्या फायनलमध्ये भाग घेऊ शकणार आहे.