मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादवला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकावं लागलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चिंतेत आहे. तर आता दुसरीकडे सुर्यकुमार दुखापतीतून केव्हा सावरणार यामुळे बीसीसीआयचं टेन्शन देखील वाढलं आहे. 


SuryaKumar Yadav ने वाढवलं बीसीसीआयचं टेन्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसल्स इंजरीमुळे सुर्यकुमार यादव आयपीएल 2022मधून बाहेर पडला आहे. ज्यामुळे रोहित शर्माच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आयपीएलनंतर टीम इंडियाला साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचं आहे. यावेळी दोन्ही टीम्समध्ये 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. मात्र या सिरीजसाठी सुर्यकुमार यादव उपलब्ध असेल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. 


दरम्यान सुर्यकुमार यादवच्या दुखापतीवर BCCI च्या अधिकाऱ्याने Insider sport शी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, सुर्यकुमार यादवची दुखापत गंभीर आहे. आम्ही त्याला आराम द्यायचा विचार केला आहे. साऊथ आफ्रिकेच्या सिरीजसाठी तो उपलब्ध असेल की नाही यावर आताच बोलणं योग्य ठरणार नाही. फीट नसलेल्या खेळाडूचा टीममध्ये समावेश करून आम्ही रिस्क घेऊ शकत नाही.


दुखापत झाल्यानंतर सुर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या मेडिकलच्या टीमच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान त्याच्या फीटनेसबाबत सिलेक्टर म्हणाले की, "ते एकदा का एनसीएमध्ये गेला की त्याच्या दुखापतीची पूर्ण माहिती मिळणार आहे. त्या आधारावर आम्ही पुढील निर्णय घेऊ. टी-20 वर्ल्डकप तोंडावर आहे, त्यामुळे आम्ही कोणतीही घाई करणार नाहीये."