नवी दिल्ली : क्रिकेट जगतामध्ये दोन भावडांच्या जोडगोळीचा खेळ आपण अनेकदा पाहिला असेल पण फार क्वचितच पिता-पुत्राचा खेळ एकत्र पाहण्याची संधी मिळते. 


वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू एकत्र  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानावर शिवनारायण चंद्रपॉल आणि त्यांचा मुलगा तेजनारायण चंद्रपॉल या जोडीचा खेळ अनेकदा चर्चेचा विषय बनला अअहे. शिवनारायण हे वेस्टइंडिजचे 43 वर्षीय पूर्व इंतरनॅशनल क्रिकेटर आहे. तर त्यांचा मुलगा तेजनारायण हा 21 वर्षीय आहे. 


क्रिकेट जगतात असा पहिलाच रनआऊट 


रिजनल सुपर 50 लिस्ट ए टुर्नामेंटमध्ये चंद्रपॉल ही पिता-पुत्राची जोडी खेळत होती. हे दोघेही क्रिकेटच्या मैदानावर होते. सुपर 50च्या सेमीफायनलमध्ये तेजनारायण नॉन स्टायकरवर असताना रनआऊट झाला तर त्याचे वडील शिवनारायण चंद्रपॉल स्टायकर होते.  
आरडी जॉनच्या बॉलावर तेजनारायण आऊट झाला. अशाप्रकारे आउट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने त्याची खास नोंद करण्यात आली आहे.  


 



 


वडिलांसमोर मुलगा झाला आऊट  


पाचव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर शिवनारायण यांनी स्ट्रेट ड्राईव्ह मारला. यावेळेस तेजनारायण क्रीजवरून थोडा पुढे गेला. समोरून येणारा बॉल पाहता तो मागे फिरला पण त्याआधीच नॉन स्टायकर एन्डवर तो स्टंपआऊट झाला. यावेळेस 'गुयाना' संघाच्या केवळ 20 धावा झाल्या होता.