लाहोर : तब्बल ८ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आज क्रिकेट परतणार आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड इलेव्हन टीमचा आज पहिला टी-20 सामना होणार आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड इलेव्हनची टीम १२, १३ आणि १५ सप्टेंबरला तीन टी-20ची सीरिज खेळणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२००९ साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं गेलं नव्हतं. २०१५ साली झिम्बाब्वेनं वनडे सीरिज खेळली होती.  


वर्ल्ड इलेव्हनसोबतच्या या टी-20 सीरिजनंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये वेस्ट इंडिजची टीम पाकिस्तानमध्ये टी-20 सीरिज खेळणार आहे. वेस्ट इंडिजबरोबरच श्रीलंकेची टीमही पाकिस्तानमध्ये जाऊन खेळणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे.


पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतत असल्यामुळे तिथल्या क्रिकेट रसिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पण भारतीय क्रिकेटपटू या सीरिजमध्ये खेळणार नसल्यानं अनेक क्रिकेट रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


वर्ल्ड इलेव्हनचा संघ- फॅप डुप्लेसी (कॅप्टन), हशीम आमला, कॉलीन मिलर, इम्रान ताहीर, मॉर्ने मॉर्कल, जॉर्ज बेली, टीम पेन, बेन कटिंग, तमीम इक्बाल, थिसारा परेरा, ग्रॅन्ट एलीयट, पॉल कॉलिंगवूड, डॅरेन सॅमी, सॅम्युअल बद्री