विराट कोहली म्हणतोय, महिला - पुरूष एकसमान नाहीत...
महिला दिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने संदेश शेअर केला आहे.
मुंबई : महिला दिवसाच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहलीने संदेश शेअर केला आहे.
हा संदेश विराट कोहलीने अभिनेत्री आणि पत्नी अनुष्का शर्माला देखील डेडिकेट केला आहे. महिला दिनाच्या दिवशी कायम स्त्री - पुरूष समानतेवर चर्चा केली जाते. मात्र विराट कोहलीने एक पाऊल पुढे जात अनोखा संदेश दिला आहे.
काय म्हणतोय विराट कोहली
विराट कोहलीने महिलांना पुरूषांप्रमाणे सन्मान मिळायलाच हवा. पण महिलांनी पुरूषांपेक्षा एक पाऊल पुढे असलं पाहिजे हा संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीने या व्हिडिओसोबत म्हटलं आहे की, माझ्यासोबत असलेल्या असाधारण महिलेला मी हा व्हिडिओ टॅग करत आहे.
विराट कोहली अनुष्काला हा व्हिडिओ टॅग केला आहे. विराटने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, महिला आणि पुरूष समान नाहीत. खरं सागायचं तर पुरूष हे महिला असण्यापेक्षा भरपूर सोप आहे. लैंगिक शोषण, भेदभाव, लिंगवाद, कुटुंबातील हिंसा यासारखे अनेक प्रश्न महिलांना सतावत असतात. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांवर महिलांनी विरोध करायला हवं.