विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, महान खेळाडूंना टाकलं मागे
विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड
सिडनी : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहला आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड' हे आता एकच समीकरण झालं आहे असं बोलायला हरकत नाही. कारण तो एकामागोमाग एक नवे विश्व विक्रम स्थापित करीत आहे. त्याने आतापर्यंत अनेक जागतिक विक्रम मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आणखी एक विश्वविक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान 22 हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज बनला आहे. सिडनी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात विराटने ही कामगिरी केली. विराटने या डावात 78 धावा करताच त्याने हा रेकॉर्ड बनवला. त्याच प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 22000 धावा पूर्ण केल्या. विराटने टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये या 22 हजार धावा केल्या आहेत.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार, 11 हजार, 12 हजार, 13 हजार, 14 हजार, 15 हजार, 16 हजार, 17 हजार, 18 हजार, 19 हजार, 20 हजार, 21 हजार वेगवान धावा करणारा जगातील पहिला फलंदाज आहे आणि आता त्याने 22 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहली 87 बॉलमध्य़े 89 धावांची खेळी करून बाद झाला. विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 71 वे शतक गमवले. एका शानदार कॅचमुळे त्याचा डाव संपुष्टात आला.
या सामन्यात 69 धावा पूर्ण करताच विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही 2 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. याबाबत तो भारताचा तिसरा खेळाडू, तर जगातील पाचवा खेळाडू ठरला. त्यांच्याआधी डेसमॉन्ड हंस, विव्ह रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी कांगारू संघाविरुद्ध ही कामगिरी केली आहे.