नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.


शमीला मोठा धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने यापूर्वीच शमीला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने खेळाडूंना बीसीसीआयच्या करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली. मात्र, या यादीमध्ये शमीचं नावच नाही. बीसीसीआयने त्याचं नाव या ग्रेडमधून वगळलं आहे.


IPL मधून शमी बाहेर?


बीसीसीआयने दिलेल्या झटक्यानंतर आता इंडियन प्रीमिअर लीग (IPL २०१८) मधूनही शमीला झटका बसण्याची शक्यता आहे. शमीला खरेदी करणाऱ्या दिल्ली डेअरडेविल्सची टीम या प्रकरणी चर्चा करत आहेत.


३ कोटींत केलं खरेदी


जर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन यांच्यात सुरु असलेला वाद लवकरात लवकर संपूष्टात आला नाही तर आयपीएलमध्ये शमी खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. दिल्ली डेअरडेविल्सने खेळाडूंच्या लिलावात मोहम्मद शमीला ३ कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.


मोहम्मद शमी प्रकरणी दिल्ली डेअरडेविल्सच्या टीमचे सदस्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


फ्रेंचायजीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "दिल्ली डेअरडेविल्सची टीम एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्रिस्तरीय करार असतो ज्यामध्ये बीसीसीआय, फ्रेंचायजी आणि खेळाडूचा समावेश असतो.