IPL 2018 सुरु होण्यापूर्वी केकेआरच्या टीमला दुसरा झटका
आयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.
नवी दिल्ली : आयपीएल २०१८ च्या मोसमाला अद्याप सुरुवातही झाली नाहीये. मात्र, सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला दुसरा एक झटका बसला आहे.
क्रिस लिन दुखापतग्रस्त
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ट्रायसीरिजमध्ये क्रिस लिन दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला पाकिस्तान सुपर लीगमध्येही सहभाग घेता आला नाही.
क्रिस लिन आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत केकेआरमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण, स्टार ऑल राऊंडर खेळाडू आंद्रे रसेल हा दुखापतग्रस्त झाला आहे.
PSL दरम्यान रसेल दुखापतग्रस्त
पाकिस्तान सुपर लीग दरम्यान रसेल दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे रसेल संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर झाला आहे. आता रसेल कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्ये खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची टीम
क्रिस लिन, मिचेल स्टार्क, दिनेश कार्तिक, रोबिन उथप्पा, कुलदीप यादव, पियूष चावला, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिशेल जॉनसन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू यादव, कैमरून डेलपोर्ट, जावोन सिएरलेस, इशांक जग्गी, अपूर्व वानखेडे