आयपीएलमध्ये या टीममधून खेळू शकतो अर्जुन तेंडुलकर
सचिनचा मुलगा असल्याने अर्जुनकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
मुंबई : काही दिवसात आयपीएल मॅच सुरू होती. पुन्हा एकदा खेळाडूंची बोली लागेल भारतात आयपीएलच करोडो चाहते आहेत दरवेळेला यामध्ये नवनवीन चेहरे दिसत असतात.
अर्जुनही दाखविणार टॅलेंट
हे नवे चेहरे कधी बॅटींग तर कधी बॉलिंगने सर्वांना इम्प्रेस करण्यात कोणती कसर सोडत नाहीत. आयपीएलच असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये नव्या खेळाडूंना टॅलेंट दाखविण्याची संधी मिळते.
क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही आपल टॅलेंट जगासमोर दाखविण्याची संधी शोधत आहे.
ऑलराऊंडर अर्जुन
अर्जुन वडिलांप्रमाणेच डाव्या हाताने गोलंदाजी करतो. तो एक ऑलराऊंडर म्हणून उदयास येत आहे.
त्याला ज्यूनियर तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. सर्वोत्तम खेळाडू बनण्यासाठी तो दिवसरात्र मेहनत करतोय.
सचिनचा मुलगा असल्याने त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
दोन टीमचे पुनरागम
यंदा आयपीएलमध्ये दोन टीम पुनरागमन करत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि राज्यस्थान रॉयल्स संघ पुन्हा खेळताना दिसणार आहेत.
प्रत्येक टीम निवडत असलेल्या ११ खेळांडूमध्ये कोणाची वर्णी लागणार याचा सर्वजण अंदाज बांधत आहेत.
यावर्षीच्या आयपीएलमध्ये अर्जुनही खेळणार आहे. सचिनप्रमाणे त्यालाही मुंबई इंडियन्समध्ये खेळण्याची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.