मुंबई : आयपीएल ११च्या मोसमातील पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये झाली. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत झालेली ही मॅच खूपच रंगतदार झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या टीमने १९.५ ओव्हर्समध्ये १६९ रन्स करत एक विकेट आणि एका बॉलने विजय मिळवला.


चेन्नई सुपर किंग्जच्या टीमकडून वॉटसनने १६ रन्स, रायुडूने २२ रन्स, रैनाने ४ रन्स, केदार जाधवने नॉट आऊट २४ रन्स आणि ब्रावोने ६८ रन्सची खेळी खेळली.


मुंबई इंडियन्सच्या टीमकडून हार्दिक पांड्या आणि मार्कंड यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतले तर, बुमराह, मिचेल मॅक्लनघन आणि मुस्तफिझूर रहमान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला.


मॅचच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावत १६४ रन्सपर्यंत मजल मारली.


मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्तफिझूर रहमान, इशन किशन, चहर, लेविस, तिवारी, कटिंग, संगवान, ड्युमिनी, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पंड्या, आदित्य तरे, मार्कंड, धनंजय, अंकुल रॉय, मिचेल मॅक्लनघन, मोहसिन खान.


चेन्नई सुपर किंग्जची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, डुप्लेसिस, हरभजनसिंग, ड्वेन ब्राव्हो, वॉटसन, सॅम बिलिंग्ज, मार्क वूड, शर्मा, मोनू कुमार, बिश्नोई, केदार जाधव, रायुडू, दीपक, असिफ, एन्गिडी, ध्रुव, मुरली विजय, इम्रान ताहीर, कर्ण शर्मा, चहर, शार्दूल ठाकूर.