IPL 2018 : हरभजन सिंहने संघ मालकांना दिली खुली ऑफर
आयपीएल २०१८ मध्ये खेळाडूंच्या ऑक्शनला आता अवघे काही तास उरले आहेत.
मुंबई : आयपीएल २०१८ मध्ये खेळाडूंच्या ऑक्शनला आता अवघे काही तास उरले आहेत.
काही खेळाडूंन ऑक्शनच्या आधीच संघात समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने रिटेनिंग लिस्टमध्ये रोहित शर्माला १५ करोड रुपये, हार्दिक पांड्याला ११ करोड रुपयांत आणि जसप्रीत बुमराहला ७ करोड रुपयांत संघात विकत घेतलं आहे.
मुंबई इंडियन्सने आपल्या सर्वात यशस्वी गोलंदाज हरभजन सिंहला रिटेन केले आहे. सोबतच आता हरभजन सिंह ऑक्शनमध्ये विकणं देखील कठीण झालं आहे. हरभजन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त विकेट घेणारा टॉप १० गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तिथेच त्याला विकत घेण्याची वाट बिकट दिसत आहे.
नुकतीच हरभजन सिंहने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर आयपीएलच्या ट्रॉफीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला शेअर करताना म्हटलंय की, या वर्षी सर्वात पहिले मी या ट्रॉफीवर हात ठेवला आहे. त्यामुळे मला संघात घेण्यासाठी प्रयत्न करा आणि सोबत ट्रॉफी देखील मिळवा.