नवी दिल्ली : आयपीएल २०१८ साठीच्या लिलावात अपेक्षेप्रमाणेच महत्त्वपूर्ण घटना घडल्या. अनेक संघांनी आपपल्या परीने खर्च करत खेळाडू विकत घेतले. पण, यात प्रशिक्षक रिकी पाँटींगने मुरब्बीपणा दाखवत दिल्ली डेअर डेविल्सचा गढ अधिक मजबूत केला आहे. रिकीने 'KKR'चा माजी कर्णधार गौतम गंभीरला खरेदी केले आहे. गंभीरची खासीयत अशी की, त्याने आतापर्यंत आयपीएलचा चषक दोन वेळा जिंकला आहे. त्यामुळे सध्या तर, दिल्ली डेअर डेविल्सचा ग्लास पूर्ण भरलेला आहे. पण, त्याचा फायदा यंदाचा आयपीएलचा चषक जिंकण्यासाठी होणार का याबाबत उत्सुकता आहे.


'गंभीर'निवडीबाबत जोरदार चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दिल्ली डेअर डेविल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटींगने म्हटले आहे की, सलामीला उतरणारा गौतम हा आयपीएलच्या ११व्या पर्वासाठी संघाचा (दिल्ली डेअर डेविल्सचा) कप्तान असेल. रिकी पाँटींग हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आहे. त्याच्या 'गंभीर'निवडीबाबत जोरदार चर्चाही झाली आहे. तसेच, गेल्या आयपीएलचा विचार करू पाहता डावखुरा फलंदाज असलेला हा फलंदाज संघासाठी भलताच फायदेशीर ठरला होता.


'गंभीर' निवडीबाबत रिकीची प्रतिक्रिया


आयपीएल २०१८साठी गंभीरला साईन केल्याबद्दल पाँटींगने प्रितक्रिया देताना म्हटले आहे की, आम्ही या विषयावर 'गंभीर'पणे चर्चा केली. त्यावेळी दिल्लीचे कप्तानपद घेण्याबाबत गंभीरने पूर्ण संमती दर्शवली होती. त्यामुळे आम्ही त्याला साईन केले. आपण, जर त्याच्या यापूर्वीच्या कामगिरीवर नजर टाकाल तर तुमच्या ध्यानात येईल की तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे.


दमदार कर्णधार


दरम्यान, गंभीरच्या आयपीएल कामगिरीवर नजर टाकता तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार राहिलेला आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला आयपीएलचा महाविजय मिळवून दिला आहे. तो अत्यांत तरूण आणि उमदा खेळाडू आहे. त्यातच दिल्ली संघाची घडी पाहता श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांसाख्या नवतरूण खेळाडूंना सांभाळून घ्यायचे तर, अनुभवी खेळाडूच्या नेतृत्वाची दिल्लीला गरज होती. त्यामुळेच रिकीने गंभीरची निवड केली असवी.


गंभीरमुळे  KKRची आयपीएलवर दोन मोहोर


KKRचा मालक असलेल्या शाहरुख खानने जगभरातील अनेक नामचीन खेळाडूंवर बोली लावली. त्यामुळे त्याचा संघही तगडा झाला. पण, हा तगडा संघ विजयासमीप पोहोचू शकत नव्हता. मग, शाहरूखने तब्बल ९ कोटी रूपायांची बोली लावत गौतम गंभीरला खरेदी केले. गौतमने पैसा आणि शाहरूखच्या निवडीचे चीज केले. आपल्या नेतृत्वाखाली त्याने KKRला २०१२ आणि २०१४ असे दोन वेळा आयपीएलचा चषक मिळवून दिला.  २०११ते २०१७ पर्यंत तो KKRचा कप्तान होता. धोनी आणि विराट कोहलीनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.


दिल्ली डेयर डेविल्सचा संघ


ग्लेन मॅक्सवेल (9 कोटी रूपये), कागिसो रबाडा (4.20 कोटी रूपये), अमित मिश्रा (4 कोटी रूपये), विजय शंकर (3.20 कोटी रूपये), राहुल तेवतिया (3 कोटी रूपये), मोहम्मद शमी (3 कोटी रूपये) , गौतम गंभीर (2.80 रुपए), कॉलिन मुनरो (1.90 कोटी रूपये), जेसन रॉय (1.50 कोटी रूपये), पृथ्वी शॉ (1.20 रुपए), अवेश खान (70 लाख रुपए) और हर्षल पटेल (20 लाख रुपए).