आयपीएल 2019 | पोलार्डचा तडाखा, हैदराबादला विजयासाठी मुंबईकडून १३७ धावांचे लक्ष्य
किरण पोलार्डचा अपवाद वगळता एकाही खेळाड़ूला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही.
हैदराबाद : किरण पोलार्डच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २० ओव्हरणमध्ये ७ विकेट गमावून १३६ रन केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडून हैदराबादला विजयासाठी १३७ रनचे आव्हान देण्यात आले आहे. हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईने सावध सुरुवात झाली होती, परंतू मुंबईला पहिला झटका कॅप्टन रोहित शर्माच्या रुपात लागला.
रोहित शर्मा ११ रनकरुन आऊट झाला. मोहम्मद नबीच्या बॉलवर फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा आपली विकेट गमावून बसला. रोहित आऊट झाल्यानंतरच्या २ ओव्हरनंतरच मुंबईला दुसरा झटका लागला. गेल्या मॅचमध्ये दमदार अर्धशतकी खेळी केलेला सूर्यकुमार यादवला हैदराबाद विरुद्धात चांगली कामगिरी करता आली नाही. तो ७ रनवर खेळत असताना एलबीडबल्यू झाला. यानंतर मुंबईने ठराविक अंतराने वि़केट गमावले.
आपल्या धडाकेबाज खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हार्दिक पांड्याला देखील आज काही विशेष करता आले नाही. हार्दिक १४ रन करुन तंबूत परतला. किरण पोलार्डचा अपवाद वगळता एकाही खेळाड़ूला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. किरॉन पोलार्डने २६ बॉ़लमध्ये ४६ रन काढल्या. यामध्ये ४ सिक्स तर २ फोरचा समावेश होता.
हैदराबादकडून सिद्दार्थ कौलने २ तर मोहम्मद नबी, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, रशीद खान या बॉ़लर्सनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.