मुंबई : आयपीएलचे १२ वे पर्व नुकतेच संपन्न झाले. मुंबईने चेन्नईचा अवघ्या १ रनने पराभव करुन विजेतपद मिळवले. यंदाच्या आयपीएलच्या पर्वात एकूण २ कोटी पेक्षा अधिक ट्विट करण्यात आले. आयपीएलच्या १२ व्या पर्वाला २३ मार्च पासून सुरुवात झाली, तर १२ मे रोजी अंतिम सामना खेळला गेला. जवळपास ५० दिवसांच्या कालावधीत २ कोटींपेक्षा अधिक ट्विट केले गेले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया वाढल्यापासून मोठ्या प्रमाणावर ट्विटरचा वापर केला जातो. क्रिकेट चाहते आपल्या सोयीनुसार आयपीएलच्या अधिकृत खात्यावरुन सामन्याचे अपडेट घेतात. आयपीएलच्या प्रत्येक सामन्याचे अपडेट हे ट्विटरद्वार दिले जातात. 


आयपीएलच्या १२ व्या पर्वा दरम्यान दररोज जवळपास ५ लाख २९ हजार ४११ ट्विट केले गेले. विशेष म्हणजे ट्विटचा हा आकडा गत वर्षांच्या तुलनेत ४४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.   


हार्दिक पांड्याचा ट्विट रेकॉर्ड


आपल्या ऑलराऊंड खेळीने प्रतिस्पर्धी टीमला ठोकून काढणाऱ्या हार्दिक पांडयाने यंदाच्या पर्वात उल्लेखनीय कामगिरी केली. यासोबतच हार्दिक पांड्याने एक रेकॉर्ड केला आहे. हार्दिक पांड्याने धोनीसोबतचा काढलेला एक फोटो सर्वाधिकवेळा रिट्विट झाला. १६ हजारांपेक्षा जास्त जणांनी पांड्याच्या ट्विटला रिट्विट केलं. 



मुंबईचा बोलबाला


आयपीएलच्या १२ व्या पर्वात ट्टविटरवर मुंबईची टीमची सर्वाधिक चर्चेत राहिली. अंतिम सामन्याच्या दरम्यान ६७ टक्के मुंबई तर ३७ टक्के चेन्नईची चर्चा पाहायला मिळाली.


धोनीची बादशाहत कायम


आयपीएलच्या १२ व्या पर्वात धोनी संदर्भात सर्वाधिक ट्विट केले गेले.  त्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, हरभजन सिंह आणि आंद्रे रसेलची चर्चा पाहायला मिळाली.