चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या प्ले ऑफमध्ये मुंबईने चेन्नईला लोळवलं आहे. या विजयासोबतच मुंबईने आयपीएलची फायनल गाठली आहे. यंदाच्या मोसमात मुंबईने चेन्नईविरुद्ध ३ मॅच खेळल्या, यातल्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. यातल्या २ मॅच या चेन्नईमध्ये, तर एक मॅच वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आली होकी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईमधलं मुंबईचं रेकॉर्ड हे आयपीएलमधल्या इतर टीमपेक्षा चांगलं आहे. २०१२ पासून मुंबईने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानात प्रत्येकवेळी हरवलं आहे. २०१२ पासून मुंबई आणि चेन्नईमध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर ५ मॅच खेळवण्यात आल्या. या पाचही मॅचमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत केलं. आयपीएलच्या पहिल्या पर्वापासून मुंबई चेन्नईवर भारी पडली आहे. मुंबई आणि चेन्नईमध्ये आत्तापर्यंत २७ मॅच झाल्या आहेत. यातल्या १६ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे, तर ११ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.


चेन्नईचा लागोपाठ चौथा पराभव


याचबरोबर चेन्नईचा मुंबईविरुद्धचा हा लागोपाठ चौथा पराभव आहे. चेन्नईला लागोपाठ चार मॅचमध्ये पराभूत करणारी मुंबई ही आयपीएलमधली पहिलीच टीम आहे. चेन्नईने घरच्या मैदानात खेळलेल्या मागच्या २१ मॅचपैकी फक्त ३ मॅच हरल्या आहेत. या तिन्ही मॅच मुंबईविरुद्धच्याच आहेत. 


रोहित शर्माचं चेन्नईतील रेकॉर्ड


२००८- ७ विकेटने विजय


२०१०- ३१ रननी विजय 


२०१२- ८ विकेटने विजय


२०१३- ९ रननी विजय 


२०१५- ६ विकेटने विजय 


२०१९- ४६ रननी विजय 


२०१९- ६ विकेटने विजय