आयपीएल २०१९ : वानखेडेवर ऋषभ पंतचं वादळ, मुंबईपुढे भलंमोठं आव्हान
ऋषभ पंतच्या वादळी खेळीमुळे दिल्लीने मुंबईपुढे मोठं आव्हान दिलं आहे.
मुंबई : ऋषभ पंतच्या वादळी खेळीमुळे दिल्लीने मुंबईपुढे मोठं आव्हान दिलं आहे. ऋषभ पंतने २७ बॉलमध्ये नाबाद ७८ रनची खेळी केली, यामध्ये ७ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. पंतने तब्बल २८८.८९ च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. ऋषभ पंतने त्याचं अर्धशतक फक्त १८ बॉलमध्ये पूर्ण केलं होतं. पंतच्या या खेळीमुळे मुंबईला विजयासाठी २१४ रनचं आव्हान आहे.
या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. मुंबईने सुरुवातीलाच दिल्लीला धक्के दिले. पृथ्वी शॉ (७ रन) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (१६ रन) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या दोन विकेट गेल्यानंतर शिखर धवन (४३ रन) आणि कॉलीन इन्ग्राम (४७ रन) यांनी दिल्लीचा डाव सावरला. कॉलीन इन्ग्रामची विकेट गेल्यानंतर ऋषभ पंतने फटकेबाजी करून दिल्लीचा स्कोअर २००च्या पुढे नेला. जगातला नंबर एकचा फास्ट बॉलर असलेल्या जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवरही पंतने सिक्सची बरसात केली.
मुंबईकडून मिचेल मॅकलेनघनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि बेन कटिंगला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा