IPL 2019: हैदराबादविरुद्ध मुंबईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे.
मुंबई : हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये मुंबई पहिले बॅटिंग करणार आहे. कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर मुंबईने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. तर हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या ऐवजी मार्टन गप्टीलला संधी देण्यात आली आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाला परतला आहे.
पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम १४ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम १२ पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि हैदराबादच्या टीमनी प्रत्येकी १२-१२ मॅच खेळल्या आहेत. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर ते प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवतील. १८ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी चेन्नई आणि १६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर असणारी दिल्ली याआधीच प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. हैदराबादच्या टीमला मात्र प्ले ऑफमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी ही मॅच जिंकणं गरजेचं आहे.
मुंबई-हैदराबादचं रेकॉर्ड
आयपीएलमध्ये मुंबई आणि हैदराबादच्या टीममध्ये १३ मॅच झाल्या आहेत. यातल्या ७ मॅच हैदराबादने आणि ६ मॅच मुंबईने जिंकल्या आहेत. पण वानखेडेवर झालेल्या मॅचमध्ये मुंबईला ३ आणि हैदराबादला फक्त एकच मॅच जिंकता आली आहे.
मुंबईची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, एव्हिन लुईस, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, बरिंदर श्रन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
हैदराबादची टीम
वृद्धीमान सहा, मार्टिन गप्टील, मनिष पांडे, केन विलियमसन (कर्णधार), मोहम्मद नबी, विजय शंकर, राशिद खान, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, बसील थंपी