IPL 2019: पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय
आयपीएलच्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आहे.
चेन्नई : आयपीएलच्या पहिल्या प्ले-ऑफमध्ये चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकला आहे. धोनीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईने टीममध्ये एक बदल केला आहे. मिचेल मॅकलेनघनच्याऐवजी मुंबईने जयंत यादवला संधी दिली आहे. तर चेन्नईलाही त्यांच्या टीममध्ये बदल करावा लागला आहे. दुखापतग्रस्त केदार जाधवऐवजी मुरली विजयला संधी देण्यात आली आहे.
मुंबईची टीम
रोहित शर्मा(कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, जयंत यादव, राहुल चहर, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह
चेन्नईची टीम
शेन वॉटसन, मुरली विजय, फॅफ डु प्लेसिस, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, दीपक चहर, इम्रान ताहिर
लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा
पराभूत टीमला आणखी एक संधी
मुंबई आणि चेन्नईपैकी जी टीम विजयी होईल ती थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभव झालेल्या टीमला आणखी एक संधी मिळेल. ८ मे रोजी दिल्ली आणि हैदराबादमध्ये एलिमिनेटर मॅच होईल. विशाखापट्टणममध्ये संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल ती टीम बाहेर जाईल. तर शुक्रवार १० मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. मुंबई आणि चेन्नईच्या मॅचमध्ये ज्या टीमचा पराभव होईल त्या टीमचा सामना दिल्ली-हैदराबाद मॅचमधल्या विजयी टीमशी होईल. क्वालिफायर-२ मध्ये विजय मिळवलेली टीम रविवारी १२ मे रोजी आयपीएलची फायनल खेळेल.
आयपीएलच्या इतिहासामध्ये चेन्नईविरुद्ध मुंबईचं रेकॉर्ड चांगलं आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये आत्तापर्यंत २६ मॅच झाल्या आहेत. यातल्या १५ मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे, तर ११ मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईच्या मैदानात झालेल्या ६ मॅचपैकी ४ मॅचमध्ये मुंबईचा विजय आणि २ मॅचमध्ये पराभव झाला. आयपीएल इतिहासात मुंबई ही एकमेव टीम आहे ज्यांची चेन्नईतली कामगिरी सरस राहिली आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफचा सामनाही चेन्नईमध्येच होणार आहे, याचा मानसिक फायदा मुंबईला होऊ शकतो.
यंदाच्या मोसमात मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये झालेल्या दोन्ही मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. पहिले मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये मुंबईचा ३७ रननी विजय झाला होता. तर चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबईने चेन्नईवर ४६ रननी मात दिली. मुंबईने दिलेल्या १५५ रनचा पाठलाग करताना चेन्नईला १०९ रनच करता आल्या.