IPL 2019 : विराटची आगपाखड पाहून अश्विनचं लक्षवेधी वक्तव्य
अखेरच्या षटकात विजयासाठी पंजाबच्या संघाला २७ धावांची आवश्यकता होती, तेव्हाच.....
मुंबई : IPL 2019 देशात सध्या एकिकडे लोकसभा निवडणुकांच्या वातावरणाला रंग चढत असतानाच क्रीडा विश्वातही आयपीएलची धूम पाहायला मिळत आहे. विविध संघांत होणारे सामने क्रिकेट प्रेमींसाठी परवणीच ठरत आहेत. असाच एक समना नुकताच पार पडला. बंगळुरू आणि पंजाब या सघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या बंगळुरूच्या संघाचा विजय झाला. या सामन्यात अनेक असे क्षण पाहायला मिळाले ज्यांची क्रिकेट विश्वात बरीच चर्चाही झाली. असाच एक क्षण म्हणजे पंजाबचा खेळाडू रवीचंद्रन अश्विन म्हणजेच आर. अश्विन बाद झाला तेव्हाचा.
अखेरच्या षटकात विजयासाठी पंजाबच्या संघाला २७ धावांची आवश्यकता होती. संघाला असणारी धावांची गरज पाहता अश्वनने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. पण, त्यानंतरच्याच चेंडूवर त्याने मारलेला फटका चुकला आणि थेट विराट कोहलीच्या हाती चेंडू जात अश्विन झेलबाद झाला. अश्विन बाद झाल्यानंतर अर्थातच बंगळुरूच्या संघाने आणि विराटने त्यांच्या अंदाजात हा आनंद साजरा केला. पण, विराटची प्रतिक्रिया अनेकांना खटकली. ज्या आवेगात अश्विन बाद होताच तो व्यक्त झाला ते काही नवं नव्हतं. पण, ही बाब सर्वांच्याच पचनी पडणारीही नव्हती. अश्विनही आपल्याच खेळीमुळे निराश असल्याचं पाहायला मिळालं.
विराटची प्रतिक्रिया पाहता त्याविषयी खुद्द अश्विननेही आपलं मत मांडलं. सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. 'मी पूर्ण निष्ठेने आणि चिकाटीने खेळलो. तो (विराट)सुद्धा त्याच पद्धतीने खेळत होता. इतकंच.... हे अगदी सोपं आहे' असं अश्विन म्हणाला.
अश्विनने दिलेली ही प्रतिक्रिया पाहता त्याच्या खिलाडूवृत्तीची प्रतिची पुन्हा एकदा आली आहे. भारतीय क्रिकेट संघातीच या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर भावनांची झालेली ही काहीशी वेगळी देवाणघेवाणं अनेकांना पचणारी नसली तरीही त्यांच्या कोणच्याची प्रकारचे मतभेद किंवा वाद नाहीत हेसुद्धा तितकच खरं.