आयपीएल 2019 | मुंबईची घौडदौड राजस्थानने थांबवली, राजस्थानचा 4 विकेटने विजय
राजस्थानकडून सर्वाधिक 87 रन जॉस बटलरने केल्या.
मुंबई : राजस्थानने मुंबईचा 4 विकेटने पराभव केला आहे. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 188 रनचे आव्हान राजस्थानने 3 बॉलआधी पूर्ण केले. राजस्थानने 19.3 ओव्हरमध्ये 6 विकेटच्या मोबदल्यात 188 रन केल्या. राजस्थानकडून सर्वाधिक 89 रन जॉस बटलरने केल्या. यानंतर कॅप्टन अंजिक्य रहाणेने 37 तर संजू सॅमसनने 31 रन काढल्या.
विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या कॅप्टन अंजिक्य रहाणे आणि जॉस बटलरने आपल्या टीमला चांगली सुरुवात मिळवून दिली. विजयासाठी आवश्यक असलेल्या 188 रनचे पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी पार्टनरशीप केली. या दोघांमध्ये 60 रनची पार्टनरशीप झाली. या जोडीला तोडण्यास कृणाल पांड्याला यश आले. कृणालने अंजिक्य रहाणेला 37 रनवर खेळत असताना सूर्यकुमारच्या हाती कॅचआऊट केले.
रहाणे आऊट झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने बटलरला चांगली साथ दिली. बटलर-सॅमसन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 87 रनची पार्टनरशीप केली. राजस्थानचा स्कोअर 147 असताना तो जॉस बटलरला राहुल चहरने सूर्यकूमार यादवला कॅटआऊट केले. जॉ़स बटलरने 89 रन केल्या. यानंतर मैदानात आलेल्या स्टीव स्मिथने संजू सॅमसनसोबत काही रन जो़डल्या. संजू सॅमसनला १७ ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जस्प्रीत बुमराहने एलबीडबल्यू केले. यानंतर राजस्थानने सलग विकेट गमावले. राजस्थानने शेवटच्या काही विकेट स्वसत्यात गमावल्या. पंरतू मैदानात असलेल्या श्रेयस गोपलने राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याने गरजेच्या वेळी टिकून राहून 13 रन केल्या. मुंबईकडून कृणाल पांड्याने ३ तर जस्प्रीत बुमराहने 2 आणि दीपक चहरने १ विकेट घेतली.
याआधी राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंग करण्यास भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांच्यात पहिल्या विकेटसाठी 96 रनची पार्टनरशीप झाली. मुंबईची पहिली विकेट रोहित शर्माच्या रुपात गेली. रोहित शर्मा 47 रन करून आऊट झाला. यानंतर काहीच ओव्हरनंतर सूर्यकुमार यादव 16 रन करुन माघारी परतला. सूर्यकुमार नंतर चौथ्या क्रमांकावर किरॉन पोलार्ड बॅटिंगसाठी आला. त्याने पंजाब विरुद्ध केलेल्या तडाखेदार खेळीमुळे त्याच्या कडून अशाच खेळीची अपेक्षा होती. पंरतु त्याला काही विशेष करता आले नाही. पोलार्ड अवघ्या 6 रन करुन आऊट झाला. त्याला जोफ्रा आर्चरने श्रेयस अय्यरच्या हाती कॅचआऊट केले.
ठराविक अंतराने विकेट जात असताना ओपनर क्विंटन डी कॉक टिकून खेळत होता. परंतू त्याला देखील जास्त वेळ खेळपट्टीवर जास्त थांबता आले नाही. डी कॉक 19 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्याने 81 रनची खेळी केली. पहिल्या विकेटची पार्टनरशीप वगळता इतर कोणत्याही जोडीला चांगली पार्टनरशीर करता आली नाही. राजस्थान कडून सर्वाधिक 3 विकेट जोफ्रा आर्चरने घेतल्या. तर धवल कुलकर्णी आणि जयदेव ऊनाडकट यांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.