IPL 2019 : आयपीएलच्या टीमना मिळाले एवढे पैसे, खेळाडूही मालामाल!
आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला.
हैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला. याचबरोबर रोहित शर्माच्या मुंबईने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयामुळे मुंबईच्या टीमवर पैशांचा वर्षाव झाला. फक्त मुंबईच नाही तर इतर टीमनाही बक्कळ पैसा मिळाला आहे. आयपीएलच्या निकषांनुसार टीमना मिळालेल्या रक्कमेच्या ५० टक्के रक्कम ही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला तर उरलेली रक्कम फ्रॅंचायजींना मिळते.
यंदाच्या मोसमात विजयी झालेल्या मुंबईला २० कोटी रुपये, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नईला १२.५० कोटी रुपये देण्यात आले. दिल्लीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आणि हैदराबादची टीम चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे दिल्लीच्या टीमला १०.५ कोटी आणि हैदराबादला ८.५ कोटी रुपये मिळाले. याचबरोबर लिलावावेळी खेळाडूंवर लावण्यात आलेली रक्कमही त्यांना दिली जाते.
खेळाडूंना मिळालेली बक्षीसं
मॅन ऑफ द मॅच : जसप्रीत बुमराह- ५ लाख रुपये
स्पर्धेतला उदयोन्मुख खेळाडू : शुभमन गिल- १० लाख रुपये
सगळ्यात जलद अर्धशतक : हार्दिक पांड्या- १० लाख रुपये
स्पर्धेतला सर्वोत्तम कॅच : कायरन पोलार्ड- १० लाख रुपये
स्पर्धेतला सुपर स्ट्रायकर- आंद्रे रसेल- १० लाख रुपये आणि गाडी
स्पर्धेतला स्टायलीश खेळाडू- केएल राहुल- १० लाख रुपये
स्पर्धेतला गेम चेंजर- राहुल चहर- १० लाख रुपये
ऑरेंज कॅप(सर्वाधिक रन करणारा खेळाडू)- डेव्हिड वॉर्नर (१२ मॅचमध्ये ६९२ रन)- १० लाख रुपये
पर्पल कॅप(सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू)- इम्रान ताहीर (१७ मॅचमध्ये २६ विकेट)- १० लाख रुपये
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर- आंद्रे रसेल- १० लाख रुपये