हैदराबाद : चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा ६ विकेटने विजय झाला. लागोपाठ ३ मॅचमध्ये पराभव पत्करल्यानंतर हैदराबादची टीम पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या या मॅचवेळी एक अत्यंत सुंदर क्षण पाहायला मिळाला. हैदराबादचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर जेव्हा फिल्डिंगसाठी मैदानात उतरत होता, तेव्हा त्याची मुलगी प्रेक्षकांमध्ये बसून वडिलांना चिअर करत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मैदानात लावण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनवर दिसल्यानंतर डेव्हिड वॉर्नरची मुलगी लाजली. हैदराबादच्या खेळाडूंनी डेव्हिड वॉर्नरला टीव्ही स्क्रीन बघायला सांगितली, यानंतर वॉर्नरही हसला. डेव्हिड वॉर्नरची मुलगी 'गो डॅडी' लिहिलेला संदेश दाखवत होती. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डिस आणि दोन मुली इवी आणि इंडी रे भारतामध्ये आहेत. वॉर्नरची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुली स्टेडियममध्ये नेहमीच उपस्थित असतात. इवी ५ वर्षांची आणि इंडी रे ३ वर्षांची आहे.



डेव्हिड वॉर्नरनेही मुलीची इच्छा पूर्ण केली. चेन्नईने ठेवलेल्या १३३ रनचं आव्हान हैदराबादने वॉर्नरच्या मदतीने अगजी सहज पूर्ण केलं. वॉर्नरने २५ बॉलमध्ये १०० रनची खेळी केली. या कामगिरीबद्दल वॉर्नरला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.


३२ वर्षांच्या डेव्हिड वॉर्नरचं बॉल छेडछाड प्रकरणी एक वर्षासाठी निलंबन झालं होतं. वर्षभरानंतर वॉर्नरने क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे. आयपीएलच्या या मोसमात वॉर्नर सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. वॉर्नरने फक्त ८ मॅचमध्ये १४५.१६ च्या स्ट्राईक रेटने आणि ७५ च्या सरासरीने ४५० रन केले आहेत. या मोसमात वॉर्नरने एक शतकही लगावलं आहे.