मुंबई : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI)जगातील सर्वात मोठी टी-20 लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) चं आयोजन करण्यासाठी तयारी करत आहे. भारतात कोरोना संसर्गामुळे आयपीएलचे सामने होणं कठीण आहे. त्यामुळे आयपीएल ही परदेशात होण्याची शक्यता आहे. बीसीसीआय यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयची पहिली पंसद मुंबई आहे. पण कोरोनामुळे भारतात सामने होणं कठीण दिसतंय. त्यामुळे यूएईमध्ये सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय सकारात्मक दिसते आहे. 'द इंडियन एक्सप्रेस' मध्ये देखील याबाबत बातमी देण्यात आली आहे.


रिपोर्टनुसार 'जर मुंबई कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर भारतात सामने खेळवले जावू शकतात. पण सध्यातरी तशी परिस्थिती दिसत नाहीये. यूएई आयपीएल सामन्यांसाठी सध्या तरी बीसीसीआयची पहिली पसंती आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन होण्याची शक्यता येथे वाढली आहे. याबाबत अजून कोणतीही माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. 


याआधी अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) ने बीसीसीआय समोर ही ऑफर ठेवली होती. जूनमध्ये यासंदर्भात एक बातमी गल्फ न्यूजमध्ये आली होती.


सध्या बीसीसीआयने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलच्या आयोजनाची योजना बनवली आहे. कारण यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० वर्ल्डकप ही रद्द होताना दिसत आहे. यावर अजून निर्णय झालेला नाही. आयसीसीच्या बैठकीत याचा निर्णय होणार आहे. 17 जुलैला बीसीसीआयची बैठक आहे. ज्यामध्ये आयपीएलवर निर्णय होऊ शकतो.


यूएईमध्ये आयपीएलचं आयोजन करण्यासाठी तेथील परिस्थिती देखील लक्षात घेतली जावू शकते. याआधी देखील २ वेळा आयपीएलचं आयोजन परदेशात झालेलं आहे.