IPL 2020 : लागोपाठ पराभवानंतर बदल करणं आवश्यक - फ्लेमिंग
चेन्नईचे कोच फ्लेमिंग यांचं मोठं वक्तव्य
दुबई : पहिल्या सात पैकी पाच सामन्यात पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रणनीतीत मोठे बदल केले जे प्रभावी ठरले. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) च्या 29 व्या सामन्यात सीएसके संघ सात गोलंदाजांसह उतरला आणि अष्टपैलू सॅम कर्रनला ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली.
विजयानंतर संघात केलेल्या बदलांविषयी विचारले असता, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की, टीमने जवळजवळ सर्व सामने एकाच प्रकारे गमावले होते. त्यामुळे असा बदल होणे आवश्यक आहे.'
सनरायझर्सविरुद्ध २० धावांनी सीएसकेचा विजय झाला. ज्यामध्ये सर्वात मोठा बदल सॅम कर्रनचा होता. फ्लेमिंग म्हणाले की, या खेळीमुळे चेन्नईला आवश्यक लय मिळू शकली. सॅम कर्रन 21 चेंडूत 31 धावा केल्या.
फ्लेमिंग म्हणाले की, "आम्ही सॅमला प्रत्येक डावात फलंदाजीसाठी सज्ज ठेवतो. आम्हाला वाटलं की जुन्या पद्धतीचा अवलंब करण्याऐवजी एकास अधिक संधी द्याव्यात आणि म्हणून आम्ही सॅमला आधी पाठवलं. आम्ही आमच्या फलंदाजांना मुक्तपणे खेळण्याची संधी दिली. सुरुवातीला सॅमने चांगल्या इनिंगसाठी लय प्रदान केली ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते कारण आम्ही सर्व सामने एकाच स्थितीत गमावले."
शनिवारी दिल्ली कॅपिटलच्या विरुद्ध शारजाह येथे झालेल्या सामन्यावर फ्लेमिंग म्हणाले की, “आम्ही परिपूर्ण संघ होऊ शकत नाही”. नवीन खेळाडू आणण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. जे त्यादिवशी फरक आणू शकतील."
शेन वॉटसनला तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास भाग पाडले गेले कारण सॅम कर्रन चांगली सुरुवात केली होती. परंतु फ्लेमिंगने त्याला एक प्रभावी युक्ती म्हटले आहे., "शेन हा एक अतिशय अनुभवी खेळाडू आहे. स्विंग गोलंदाजांसमोर तो पॉवरप्लेच्या दुसर्या टप्प्यात आक्रमक दृष्टीकोनाने खेळू शकतो."