मुंबई : IPL 2020 चा महासंग्राम सुरु झाल्यापासून दर दिवशी यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंबाबतची माहिती, विविध घडामोडींबाबतची वृत्त आणि अर्थातच सामन्यांच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच सध्या एक असं वृत्त हाती आलं ज्यामुळं प्रथमत: काहींना चिंता वाटली. कारण हे वृत्त होतंच तसं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबच्या संघातील तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा खेळाडू ख्रिस गेल याला रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं गेलं. गेल रुग्णालयात दाखल होणं ही संघासाठी धोक्याचीच घंटा. शिवाय या खेळाडूला नेमकं झालं काय, असा प्रश्न इथं क्रीडारसिकांच्या मनात घर करुन गेला. चिंतेची हीच छाया अधिक गडद होण्यापूर्वी खुद्द गेलनंच सोशल मीडियावर थेट रुग्णालयातून त्याचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्याचा भलताच स्वॅग पाहायला मिळत आहे. 


मुळात गेल हा त्याच्या खोडकर आणि तितक्याच मनमिळाऊ अंदाजासाठीसुद्धा ओळखला जातो. त्याचीच झलक त्यानं पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळाली. फोटोला कॅप्शन देत आपण या #UniverseBoss असल्याचं त्यानं लिहिलं. 'मी तुम्हाला एक सांगू शकतो, की केव्हाही न लढता मी हार मानणार नाही. #UniverseBoss आहे मी. हे केव्हाही बदलणार नाही. तुम्ही माझ्याकडून शिकू शकता. पण, असंही नाही की, मी जे करतो तेच तुम्हीही करावं किंवा माझ्याच पावलावर पाऊल ठेवावं', असं त्यानं फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 



 


फूड पॉइजनिंग झाल्यामुळं गेल सध्या संघाबाहेर असल्याचं म्हटलं जात आहे. पण, उपचार घेत असतानाही त्यानं क्रीडारसिकांना आपण किती आनंदात आहोत अगदी न विसरता सांगितलं आहे. एका अर्थी त्यानंच चिंता दूर केली आहे असं म्हणायला हरकत नाही.