IPL 2020: रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय
रोमांचक सामन्यात दिल्लीचा पंजाबवर विजय
दुबई : इंडियन प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आणि दुसरा सामना रोमांचक ठरला. दिल्ली टीमने पंजाबला सुपरओव्हरमध्ये पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने मार्कस स्टॉयनिसच्या आतिशी अर्धशतकाच्या जोरावर 8 गडी गमवत 157 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब संघाने मयंक अग्रवालच्या 89 धावांच्या खेळीच्या जोरावर 8 गडी गमवत 157 धावा केल्या आणि सामना बरोबरीत आला.
स्कोअर बरोबरीनंतर सुपर ओव्हर झाली. दिल्लीसाठी रबाडाने बॉलिंग करत पंजाबला 2 धावांवर बाद केले. पंजाबकडून फलंदाजीसाठी आलेले कर्णधार केएल राहुल दोन धावा काढून बाद झाला तर ग्लेन मॅक्सवेल खाते उघडू शकला नाही. तिसऱ्या बॉलवर ही विकेट गेली.
पंजाबचा कर्णधार केएल राहुलने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या विकेटसाठी मयंकबरोबर 30 धावांची भागीदारी केली पण मोहित शर्माच्या बॉलवर तो २१ धावांवर बाद झाला.
शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीकडून ओपनिंग केली. धवनच्या चुकीमुळे संघाला पहिला धक्का बसला. शॉटनंतर धवन पुढे धावला पण पृथ्वीने त्याला परत पाठवले. केएल राहुलने क्रीजवर परतण्यापूर्वी त्याला शून्यावर बाद केले. यानंतर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वीला ख्रिस जॉर्डनने आऊट केले.
संघातील मधल्या फळीतील फलंदाज ऋषभ पंतने 29 बॉलमध्ये 31 धावांची चांगली खेळी खेळली, पण त्याचा डाव रवी विश्नोईने संपवला, तर कर्णधार श्रेयस देखील 39 धावांवर आऊट झाला. मार्कस स्टोइनिसने 53 धावांची शानदार खेळी साकारली.