दुबई : आयपीएलचा 38 वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमांचक विजयामुळे पंजाबचा आत्मविश्वास वाढला असेल. पण आता त्यांना दिल्ली कॅपिटल संघासह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवायचे आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या विक्रमाविषयी सांगायचे तर दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात 25 सामने झाले आहेत. दिल्लीने 11, तर पंजाबने 14 सामन्यात विजय मिळविला आहे. 20 सप्टेंबर रोजी या दोघांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात मॅच टाय झाली होती. त्यानंतर सुपरओव्हरमध्ये दिल्लीने विजय मिळवला होता.


डेथ ओव्हर्सची गोलंदाजी, ग्लेन मॅक्सवेलचा खराब फॉर्म आणि कमकुवत मध्यम ऑर्डर ही संघासाठी चिंतेची बाब आहे. प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना उर्वरित पाच सामने जिंकावे लागतील. राहुल आणि मयंक अग्रवाल स्पर्धेत पहिल्या 2 स्थानावर असून देखील संघाला विजयासाठी संघर्ष करावा लागतोय.


ख्रिस गेलच्या यशस्वी पुनरागमनमुळे सलामीवीरांवरचा दबाव कमी झाला असला तरी, विशेषत: राहुल आता अधिक मोकळेपणाने खेळू शकतो. निकोलस पूरनने तो किती सक्षम आहे हे दर्शविले आहे, फलंदाज म्हणून दबाव मॅक्सवेलवर आहे, परंतु तो उपयुक्त फिरकीपटू असल्याचे सिद्ध होत आहे. दिल्ली कॅपिटल विरुद्ध हा संघ मॅक्सवेलला खेळवेल अशी अपेक्षा आहे.


सध्याच्या स्पर्धेत दिल्लीचा संघ आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे आणि शनिवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या विजयामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. पृथ्वी शॉ काही सामन्यांत खाते उघडण्यात अपयशी ठरल्यानंतर मोठी खेळी खेळण्यास उत्सूक असेल तर शिखर धवन पुन्हा फॉर्मात परतला आहे.


दिल्ली संघाने 9 पैकी 7 सामने जिंकण्यात यश मिळविले आहे. पुढचा विजय त्याला प्ले ऑफमध्ये घेऊन जाईल. अक्षर पटेलनेही फलंदाजीद्वारे आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. रवींद्र जडेजाच्या बॉलवर त्याने 3 सिक्स मारून दिल्ली विजयी केले.