IPL 2020 : यूएईमध्ये सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात आता फक्त तीन सामने शिल्लक आहेत. आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबईने आधीच धडक दिली आहे. जो संघ यंदा आयपीएलची ट्रॉफी जिंकेल त्याला किता पैसे देण्यात येणार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलची बक्षीस रक्कम कमी केली आहे. 2019 च्या आयपीएलच्या तुलनेत या वेळी संघांना निम्मे बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयने मार्च 2020 च्या सुरुवातीला जाहीर केले होते की, यावेळी आयपीएलच्या बक्षीस रकमेत आणि खर्चात कपात केली जात आहे. आयपीएल 2019 ची विजयी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला बक्षीस म्हणून 20 कोटी रुपये मिळाले होते. परंतु यावेळी ही रक्कम निम्मी करण्यात आली आहे.


आयपीएल 2020 च्या विजेत्या संघाला 10 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. आयपीएलच्या 13 व्या सत्रात फायनल जिंकणार्‍या संघाला ट्रॉफीसह 10 कोटींचा धनादेश देण्या येणार आहे. वृत्तसंस्था पीटीआयनेही मार्च 2020 मध्ये याची पुष्टी केली. यावर्षी उपविजेत्या संघाला बक्षीस म्हणून 12.50 कोटी रुपये नव्हे तर 6.25 कोटी रुपये मिळणार आहेत. इतकेच नाही तर प्लेऑफमध्ये तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना देखील निम्मे बक्षीस मिळणार आहे.


यावेळी बीसीसीआयने आधीच माहिती दिली होती की, या वेळी क्वालिफायर 2 मध्ये पराभूत झालेल्या संघांना 4.375 कोटी रुपये मिळतील. आयपीएलसारख्या स्पर्धेच्या वेळी ही बक्षीस रक्कम फारशी मोठी वाटत नाही. कारण त्यामध्ये 10 ते 15 कोटी रुपयांमध्ये एक-एक खेळाडू विकत घेतले जातात व रिटेन केले जातात. परंतु बोर्ड व फ्रेंचायझीची कमाई ही बक्षीसाची रक्कम नसून स्पॉन्सर असतात. बीसीसीआयने मार्चमध्येच आयपीएलच्या आठही फ्रँचायझींना पत्र पाठविले होते की, बक्षिसाची रक्कम यंदा कमी केली जात आहे. त्यावेळी सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आणखी बरेच बदल केले आहेत.