IPL 2020 : आयपीएलसाठी पहिली टीम युएईला रवाना
कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी किंग्स इलेव्हन पंजाबची टीम युएईला रवाना झाली आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीने विमानातले काही फोटो त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर टाकले आहेत. मोहम्मद शमीसोबत पंजाबचे इतर खेळाडूही दिसत आहेत.
मोहम्मद शमीशिवाय किंग्स इलेव्हन पंजाबने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये वसीम जाफरही दिसत आहे. आयपीएल २०२० साठी युएईला रवाना झालेली किंग्स इलेव्हन पंजाब ही पहिलीच टीम ठरली आहे.
दुसरीकडे राजस्थान रॉयल्सच्या टीमनेही युएईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. राजस्थान रॉयल्सनेही खेळाडूंची तयारी सुरू असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत.