IPL 2020: चेन्नई विरुद्ध आज कार्तिकची अग्निपरीक्षा
आज कोलकाता आणि चेन्नई यांच्यात रंगणार सामना
अबुधाबी : आयपीएलमध्ये आजचा सामना धोनीच्या नेतृत्वात चेन्नई आणि कार्तिकच्या नेतृत्वात कोलकाता या 2 संघात रंगणार आहे. कोलकारा नाईट रायडर्स आतापर्यंत काही खास कामगिरी करु शकलेली नाही.
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याची अग्निपरीक्षा आहे. कारण बॅट्समन म्हणून तो काही खास करु शकलेला नाही. केकेआरने इंग्लंडचा वर्ल्ड कप विनर कर्णधार इयोन मोर्गनला संघात घेतलं आहे. पण त्याला कर्णधार केलं नाही. कार्तिकने आतापर्यंत 4 सामन्यात फक्त 37 रन केले आहेत.
मोर्गन आणि आंद्रे रसेलच्या आधी कार्तिक खेळतो आहे. बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टॉम बँटनच्या जागी अजूनही तो सुनील नरेनला उतरवत आहे. पण नरेन देखील फॉर्ममध्ये नाही. बँटनची तुलना केविन पीटरसनसोबत होते. नरेनने 4 सामन्यात फक्त 27 रन केले आहेत. केकेआरकडे अनेक चांगले बॉलर्स आहेत. पण त्यांचा वापर होत नाहीये. पॅट कमिंस देखील सध्या खराब फार्ममध्ये आहे.
दिल्लीच्या विरुद्ध मोर्गन आणि राहुल त्रिपाठीने चांगली खेळी केली पण ते विजय मिळवून देऊ शकले नाहीत. डेथ ओवर्समध्ये दिल्लीची बॉलिंग चांगली झाली. त्यामुळे कर्णधार म्हणून कार्तिकची कसोटी लागणार आहे.
कोलकाता प्लेइंग इलेवन : शुभमन गिल, सुनील नरेन, राहुल त्रिपाठी, नीतीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, इयोन मोर्गन, पॅट कमिंस, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
कोलकाता संपूर्ण टीम : दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नीतीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, पॅट कमिंस, इयोन मोर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक, अली खान.