शारजाह : आयपीएल 2020 मधील 46 वा सामना आज किंग्ज इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट राइडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. पंजाबने चार सामने जिंकत आपली दावेदारी दाखवली आहे. दुसरीकडे कोलकाता देखील आपली दावेदारी दाखवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग्ज इलेवन पंजाबने 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ते पाचव्या स्थानावर आहेत. तर कोलकाता 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. 


प्लेयोफची शर्यत आता बरीच कठीण झाली आहे. पंजाब आणि कोलकाता दोन्ही हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरतील. कारण दोघांसाठी आता हा सामना महत्त्वाचा आहे


किंग्ज इलेवनची टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. लागोपाठ 5 सामने हारल्यानंतर त्यांनी बंगळुरु आणि त्यानंतर मुंबई आणि दिल्लीचा पराभव करत पुन्हा वापसी केली आहे. हैदराबाद विरुद्ध देखील त्यांनी चांगला संघर्ष केला.


पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल दोघेही फॉर्ममध्ये आहे. क्रिस गेल सारखा खेळाडू त्यांच्याकडे आहे. गेल आल्यापासून त्यांनी एकही सामना गमावलेला नाही.


अग्रवाल गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. आजच्या सामन्यात तो खेळू शकतो.


निकोलस पूरन देखील फॉर्ममध्ये आहे. पण ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म देखील संघासाठी चिंतेचा विषय आहे.