दुबई : आयपीएल-2020 मधील 22 व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप ही किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यांच्याकडे कायम आहे तर पर्पल कॅपही दिल्ली कॅपिटलच्या रबाडाकडे आहे. गुरुवारी आयपीएलमध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 69 धावांनी पराभव केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात केएल राहुलला केवळ 11 रन करता आले. दुसर्‍या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे. राहुलने सहा सामन्यांत 313 धावा केल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या चेन्नईच्या फाफ डु प्लेसिस 6 सामन्यांत 299 धावा केल्या आहेत. पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवाल 281 रनसह तिसर्‍या स्थानावर आहे.


गोलंदाजांमध्ये रबाडा पाच सामन्यांत 12 विकेटसगह पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट आहे. बुमराहने 11 तर बोल्टने आतापर्यंत 10 विकेट घेतल्या आहेत.


मुंबई इंडियन्स पहिल्या क्रमांकांवर आहे. सहा सामन्यांपैकी 4 सामने मुंबईने जिंकले असून आठ गुण त्यांच्या खात्यात जमा आहेत. दुसर्‍या स्थानावर दिल्ली आहे तर तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आहे.