IPL 2020: कुलदीप यादवचं केकेआरचे कोच डेविड हसीकडून कौतूक
2019 मध्ये 9 सामन्यांमध्ये कुलदीप यादवला फक्त 4 विकेट मिळाल्या होत्या.
मुंबई : गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये कुलदीप यादवने आपल्या कामगिरीने कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) निराश केले, परंतु या संघात भारतीय फिरकीपटू आपला खेळ खेळणार असल्याचे संघाचे कोच डेव्हिड हसी यांना वाटते. तो अव्वल आहे आणि तो सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करेल. असं डेविड हसी यांनी म्हटलं आहे. 2019 मध्ये 9 सामन्यांमध्ये कुलदीप यादवला फक्त 4 विकेट मिळाल्या होत्या.
हसी यांनी पीटीआयला सांगितले की, 'युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये कुलदीपला आत्मविश्वासाबाबत कोणतीही अडचण होणार नाही. माझा वैयक्तिक विश्वास आहे की, शेवटच्या--9-दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर तो आपल्या खेळात सर्वात वर आहे." तो चांगले क्षेत्ररक्षण करीत आहेत, तो चांगला धावत आहे. तो मैदान चांगले कव्हर करत आहे. तो चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करत आहे.'
कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाला होता की, खराब फॉर्ममुळे कुलदीपला संघातून काढून टाकण्यात आले होते, कारण संघाने त्याला ब्रेक द्यायचा होता जेणेकरून तो नव्याने परत येऊ शकेल. हसी म्हणाले की, 'कुलदीप खूप आत्मविश्वासात आहे. तो बॉलबरोबर काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे त्याला माहित आहे, तो दोन्ही प्रकारे बॉल फिरवितो. तो खेळ तल्लखपणे वाचतो.'