अबुधाबी : आयपीएलच्या 24 व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात सामना होत आहे. सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 164 धावा केल्या. विजयासाठी पंजाबला 165 धावांची गरज आहे. केकेआरसाठी युवा खेळाडू शुभमन गिलने 57 आणि कर्णधार दिनेश कार्तिक याने 58 करत चांगली पार्टनरशिप केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 13 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न गमवता 106 धावा केल्या होत्या. मयंक अग्रवाल 36 बॉलमध्ये 56 रनची आक्रमक खेळी खेळली.


किंग्ज इलेव्हन पंजाबने सलग 3 सामने गमावले आहेत. तर कोलकाताने शेवटच्या सामन्यात विजय मिळवला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबने आतापर्यंतच्या 6 सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. त्याचवेळी केकेआरने खेळलेल्या 5 पैकी तीन सामने जिंकले आहेत.


मयंक अग्रवालचे जबरदस्त अर्धशतक


फॉर्मात असलेला फलंदाज मयंक अग्रवालने केकेआरच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. 33 चेंडूत त्याने अर्धशतक ठोकले. आतापर्यंत त्याने आयपीएल कारकीर्दीचे 7 वे अर्धशतक ठोकले आहेत.


केएल राहुलची चमकदार फिफ्टी


कर्णधार केएल राहुलने पंजाबला शानदार सुरुवात दिली. कर्णधार म्हणून तो उत्तम कामगिरी करत आहे. त्याने देखील 42 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. केएल राहुलचे या मोसमातील हे तिसरे अर्धशतक आहे.


पॉवरप्लेमध्ये पंजाबची चांगली सुरुवात


किंग्ज इलेव्हन पंजाबने पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली. पंजाबने 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमवता 47 धावा केल्या. पंजाबने 10 ओव्हरनंतर एकही विकेट न गमवता 76 रन केले.