मुंबई : आयपीएलच्या १३ IPL 2020 व्या हंगामाचं विजेतेपद मुंबईच्या संघानं पटकावलं. पुन्हा एकदा हे चषक Mumbai मुंबईच्याच संघाकडे आलं. अंतिम सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीला ५ गडी राखत नमवलं. मुंबईच्या संघाच्या वाट्याला आलेलं आयपीएलचं हे पाचवं विजेतेपद. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वच स्तरांतून मुंबईच्या संघावर कौतुकाचा वर्षावही सुरु झाला. पण, तरीही या संघाला नुकसान झालं. कोरोना व्हायरसमुळं BCCI चा आयपीएलच्या आयोजनात अनेक अडथळे आले. याच कारणामुळं संघालाही मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं. यंदाच्या वर्षी मुंबईच्या संघाला अवगे १० कोटी रुपये बक्षिस स्वरुपात मिळाले. तर, उपविजेत्या delhi दिल्लीला ६.२५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या हैदराबाद आणि बंगळुरू या दोन्ही संघांना प्रत्येकी ५-५ कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. 


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल सहा महिने उशिरानं सुरु झाली. त्यातच सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या येण्यावर निर्बंध असल्यामुळं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अर्थार्जनाच्या वाटा कमी झाल्या. त्यातच भारत- चीन वादामुळं vivo आयपीएलच्या टायटल स्पॉन्सर पदावरुन मागे झालं. ज्यामुळं बीसीसीआयचं मोठं नुकसान झालं. 


जिथं विवोसह वर्षाला ४५० कोटी रुपयांचा करार होतो तिथंच यंदा ड्रीम इलेव्हननं BCCI ला एका हंगामासाठी २०० कोटी रुपयेच दिले होते.


 


यंदाच्या वर्षी झालेल्या या सर्व नुकसानामुळं अखेर बीसीसीआयनं बक्षिसपात्र रकमेत कपात केल्याचं म्हटलं जात आहे.