दुबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या वेळापत्रकाची घोषणा अखेर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. यंदाच्या मोसमातला पहिला सामना हा गतविजेती मुंबई आणि चेन्नईमध्ये होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या मोसमात मुंबईच्या ८ मॅच अबुधाबीमध्ये, ३ मॅच शारजाह आणि ३ मॅच दुबईमध्ये होणार आहेत. तर १२ मॅच या संध्याकाळी ७.३० वाजता आणि २ मॅच दुपारी ३.३० वाजता होणार आहेत. आयपीएलने सध्या ग्रुप स्टेजच्या स्पर्धेच्या वेळापत्रकाचीच घोषणा केली आहे. अजून आयपीएलच्या प्ले ऑफ मॅच आणि फायनलचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.


मुंबईच्या मॅचचं वेळापत्रक 


१९ सप्टेंबर २०२०- मुंबई विरुद्ध चेन्नई, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


२३ सप्टेंबर २०२०- मुंबई विरुद्ध कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


२८ सप्टेंबर २०२०- मुंबई विरुद्ध बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई


१ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध पंजाब, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


४ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता, शारजाह


६ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध राजस्थान, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


११ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता अबुधाबी


१६ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध कोलकाता, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


१८ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध पंजाब, संध्याकाळी ७.३० वाजता, दुबई


२३ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध चेन्नई, संध्याकाळी ७.३० वाजता, शारजाह


२५ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध राजस्थान, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


२८ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध बंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता, अबुधाबी


३१ ऑक्टोबर २०२०- मुंबई विरुद्ध दिल्ली, दुपारी ३.३० वाजता, दुबई


३ नोव्हेंबर २०२०- मुंबई विरुद्ध हैदराबाद, संध्याकाळी ७.३० वाजता, शारजाह


मुंबईची टीम


रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, मिचल मॅकलॅनघन, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिनसन, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, इशान किशन, अनुकूल रॉय, आदित्य तरे, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, धवल कुलकर्णी, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय